- नूतनीकरणासाठी २२९ कोटी ५७ लाख रुपयांच्या निविदा
- ३६ महिन्यांचा लागणार कालावधी
बेळगाव / प्रतिनिधी
सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या नूतनीकरणाला विमानतळ प्राधिकरणाने परवानगी दिली असून प्रवासी टर्मिनल बिल्डिंगसह धावपट्टी व इतर सुविधांसाठी एकूण २२९ कोटी ५७ लाख रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. तर नूतनीकरणासाठी ३६ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
बेळगावच्या विमानतळाचा कायापालट करण्याचा प्रयत्न विमानतळ प्राधिकरणाने सुरू केला असून एकूण २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे टर्मिनलचे बांधकाम केले जाणार आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम होणार आहे. भविष्यात विमानांची संख्या वाढणार असल्याने ५०० विमाने येथील व ७०० विमाने जातील अशी व्यवस्था केली जाणार आहे.
0 Comments