विजयपूर / वार्ताहर
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.कवडीमट्टी (ता. मुद्देबिहाळ; जि. विजयपूर) गावानजीक ही घटना घडली.
देवेंद्रप्पा पुजारी (वय ३०) आणि चंद्रशेखर तालिकोटे (वय २३) दोघेही (रा.नालतवाड ता.मुद्देबिहाळ) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. गंभीर जखमी किशोर तडसद यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. तसेच उत्तरीय तपासणीसाठी मुद्देबिहाळच्या सरकारी रुग्णालयात पाठविले. प्रकरणाची मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments