- तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ६२३ सदस्यांना लागले वेध
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाचे आरक्षण उद्या सोमवार दि. १९ जून रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांच्या उपस्थितीत सकाळी १० वा. पासून खानापूरच्या पाटील गार्डनमध्ये आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी तालुका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. या ठिकाणी केवळ ग्रामपंचायत सदस्यांना प्रवेश दिला जाणार असून प्रत्येक सदस्यांनी येताना आपले ओळखपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक पदासाठी जाहीर होणारे हे आरक्षण आगामी ३० महिन्यांच्या कालावधीसाठी राहणार आहे. त्यामुळे उद्या जाहीर होणाऱ्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाकडे तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ६२३ सदस्यांचे लक्ष लागले आहे.
0 Comments