बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी राज्यातील १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांची बदली करण्यात आली असून ते आता म्हैसूर झोन डीजीपी म्हणून सेवा बजावणार आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी सतीश कुमार यांची बदली बेंगळूर शहर पश्चिम विभागात करण्यात आली आहे. सतीशकुमार यांच्या आयजीपी पदाचा कार्यभार हुबळी पोलीस आयुक्त रमण गुप्ता सांभाळणार आहेत.
0 Comments