चिक्कोडी / वार्ताहर 

कार आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच ठार झाला. चिक्कोडी-मिरज मार्गावरील केरुर क्रॉसनजीक ही घटना घडली. लखाप्पा मालू हेगन्नावर (वय ५५, रा.नागराळ, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते नागराळ गावातील बाळूमामा मंदिराचे संस्थापक व पुजारी होते. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, लखाप्पा शनिवारी सायंकाळी ६ वाजता ते केरुर गावात कामासाठी गेले होते. सायंकाळी काम आटोपून हिरेकोडी मार्गावरून चिक्कोडीकडे जाण्यासाठी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारची धडक बसली. त्यामुळे दुचाकीस्वार लखाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चिक्कोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.