![]() |
(फोटो व व्हिडीओ सौजन्य : ह. भ. प. श्री.परशराम तुप्पट) |
आषाढी एकादशी निमित्त सुळगा (हिं.) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळातर्फे आज पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली.
![]() |
(विठ्ठल - रुक्मिणी मूर्तीचे पूजन करताना ग्रा. पं. सदस्य श्री. यल्लाप्पा सिद्धाप्पा कलखांबकर आणि ग्रा. पं. अध्यक्षा सौ. निर्मला यल्लाप्पा कलखांबकर) |
प्रारंभी विठ्ठल लक्ष्मण कणबरकर यांच्याहस्ते गणेश पूजन, एस. एस. बुरली (हेस्कॉम मेकॅनिकल) सत्कारमूर्ती बंबरगा यांच्या हस्ते तुकाराम मूर्तीपूजन, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा सिद्धाप्पा कलखांबकर, ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला यल्लाप्पा कलखांबकर यांच्याहस्ते विठ्ठल रुक्मिणीमूर्ती पूजन, ग्रा. पं. अध्यक्षा तुरमुरी वैशाली रघुनाथ खांडेकर यांच्याहस्ते दिंडी तुळशी पूजन, अनिता लक्ष्मण पाटील यांच्याहस्ते तुळशीपूजन, शिवाजी सूर्याजी भडांगे (सत्कारमूर्ती सांबरा) यांच्याहस्ते विणापूजन, सागर भरमा सांगावकर, ग्रा. पं. सदस्या वर्षा सागर सांगावकर यांच्याहस्ते पादुका पूजन, ग्रा. पं. सदस्य भागाण्णा कल्लाप्पा नरोटी यांच्याहस्ते कासव पूजन तर दीपक मल्लाप्पा पाटील यांच्याहस्ते श्रीराम फोटो पूजन करण्यात आले.
- सत्कार कार्यक्रम -
यानंतर देवस्की पंच कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गुंडू पाटील, सदस्य लक्ष्मण कोवाडकर, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा सि. कलखांबकर, ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला य. कलखांबकर, अनिता लक्ष्मण पाटील, शिवाजी सूर्याजी भडांगे ,शारदा शिवाजी भडांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
- सत्कार कार्यक्रम -
यावेळी ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा उर्फ बाळू पाटील, सागर भरमा सांगावकर, ग्रा. पं. सदस्या वर्षा सागर सांगावकर, विठ्ठल लक्ष्मण कणबरकर, नारायण भरमा कदम, यल्लाप्पा रवळू कदम, रवळू यल्लाप्पा चौगुले, परशराम नागो कदम, बाळू भरमा पाटील, तुकाराम र. चौगुले, नारायण कणबरकर, लक्ष्मण मारुती पाटील, यल्लाप्पा गडकरी, जोतिबा चौगुले, परशुराम चौगुले, भाऊ तुप्पट, पप्पू कलखांबकर, परशराम कलखांबकर, प्रसाद शहापूरकर, मनोज कणबरकर, ईश्वर चोपडे, बाळू शंकर कलखांबकर, लक्ष्मण कुरणे उमाजी पाटील ,यल्लाप्पा भातकांडे यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
मान्यवरांच्याहस्ते दिंडी सोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह सर्व पूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते जयवंत बाळेकुंद्री यांच्यासह नागनाथ जाधव यांच्याहस्ते दिंडीचे तर बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष तथा मराठा समाजाचे नेते विनय विलास कदम यांच्यासह श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगाव तालुकाध्यक्ष ह. भ. प. परशराम राजाराम तुप्पट यांच्याहस्ते रथाचे उद्घाटन करून या पायी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला.
0 Comments