चंदगड / लक्ष्मण यादव
चंदगड पोलिस स्थानकाचे निरीक्षक संतोष घोळवे यांनी वडगाव पोलीस स्थानकामध्ये असताना विविध गुन्ह्यात उत्कृष्ट तपास केल्याबद्दल त्यांना 'सर्वोत्कृष्ट अपराधसिध्दी' पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
पोलिस निरीक्षक संतोष घोळवे वडगाव पोलीस स्थानकामध्ये असताना कलम ३०२, ३७६, ३७६ अ, ३६४ सह पोक्सो का. क. २०१२ -४, ६, ८, १०, १२ चा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी सर्वात्कृष्ट अपराधसिध्द पुरस्काराकरिता निवड करून नुकताच जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments