• चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
  • एम. के. हुबळीनजीक घटना ; ट्रकचा अक्षरशः चुराडा
  • सुदैवाने चालक बचावला

बेळगाव / प्रतिनिधी 

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलावरून तब्बल ३० फूट खाली कोसळला. मात्र सुदैवाने ट्रक चालक अपघातातून बचावला. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एम. के. हुबळीनजीक ही घटना घडली. रामदास गोडे असे अपघातग्रस्त ट्रक चालकाचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्त ट्रक चिक्कमंगळूरवरून महाराष्ट्रामध्ये लाकूड वाहतूक वाहतूक करत होता. दरम्यान मलप्रभा नदी नजीक एम. के.हुबळी येथे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक सरळ पुलावरून खाली कोसळला. यात ट्रकचा अक्षरशः चुरडा झाला. दरम्यान या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात झाली आहे.