बेळगाव / प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंती प्रित्यर्थ उद्या शनिवार दि. १० जून २०२३ रोजी सायंकाळी ६ वा.प्रबुद्ध भारततर्फे "हिंदुत्व आणि सामाजिक क्रांती" या विषयावर वक्ते श्री. सात्यकी सावरकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

सदर व्याख्यान चिंतामणराव सभागृह चिंतामणराव पी. यू. कॉलेज (मीरापूर/ कचेरी गल्ली) शहापूर बेळगाव येथे होणार आहे. तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. सचिन सबनीस, सहसंयोजक डॉ. सुशांत जोशी यांनी केले आहे. व्याख्यानासाठी येणाऱ्यांनी एसपीएमरोड  किंवा शिवसृष्टी नजीक वाहने पार्किंग केल्यास सोयीचे होईल अशी सूचना करण्यात आली आहे.