बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक पोलीस दलातील कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची  माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी त्यांनी बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. 

बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अवैध धंदे, गैरप्रकारांना आळा घालण्यात निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. विशेषतः बेळगाव शहरातील जातीय दंगलींना पायबंद घालून ते चांगलेच प्रसिद्धीत आले होते. हेमंत निंबाळकर हे खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे पती होत.