बेळगाव / प्रतिनिधी

मृग नक्षत्राने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. राकसकोप जलाशयातील डेड स्टॉक उपसण्याचे संकेत दिसू लागले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाच जुलै पर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल अशी माहिती दिली आहे. परंतु वेळीच पाऊस न पडल्यास मोठी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते असे हे त्यांनी सांगितले आहे.


सध्या संपूर्ण शहराला पाणीटंचाईने भेडसावले आहे.पाण्याच्या प्रतीक्षेत तासंतास ताटकळण्याची वेळ आली आहे. बेळगाव शहरात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेळगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.विहिरींनीही तळ गाठला आहे. त्याची झळ बसू लागली आहे