बेळगाव : हलगा येथील श्री मरगाई देवीची यात्रा आयोजित करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत परंपरेनुसार यात्रा साजरी करण्याचे ठरविण्यात आले. २० वर्षांपूर्वीचा देवीचा लहान गाडा करून गड्याला बकरी जुंपून गाडा गावच्या सीमेवर सोडण्यात आल्यानंतर मंगळवार दि. ११ जुलै २०२३ रोजी मोठ्या उत्साहात यात्रा पार पाडण्याचे ठरविण्यात आले. दि. २० जून २०२३ रोजी पीकपाणी चांगले होण्यासाठी तसेच रोगराईचे निवारण करण्यासाठी देवीला गाऱ्हाणे घालण्यात येणार आहे. त्यानंतर २० जून, २७ जून, ४ जुलै, १० जुलै, ११ जुलै असे पाच दिवस वार पाळण्यात येणार आहेत.