बेळगाव : होन्नीहाळ (ता. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक राधाबाई रामकृष्ण जाधव  (वय ६६) यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई , नातवंडे  असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. भाजपचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या त्या मातोश्री होत.