बेळगाव : आशिया करंडक  हॉकी स्पर्धेत सर्वाधिक चारवेळा जिंकण्याचा पराक्रम केल्याबद्दल त्याचबरोबर मलेशियात होणाऱ्या ज्युनियर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. या शानदार यशाचं कौतुक हॉकी बेळगावतर्फे करण्यात आले. 

हॉकी बेळगावतर्फे विजयोत्सव धर्मवीर संभाजी चौकात मिठाई व फटाके फोडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. मिठाई व फटाके  हॉकी बेळगांवचे सदस्य माजी महापौर संजय शिंदे व सुरेश पोटे यांनी पुरस्कृत केले होते. 

प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी विजयोत्सवाची माहिती दिली तर सचीव सुधाकर चाळके यांनी आॅलिंपिकवीर बंडू पाटील यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण केला. हॉकीपटू मुला-मुलींनी उपस्थितांना मिठाईचे वाटप केले. 

यावेळी उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, विकास कलघटगी, गणपत गावडे, उत्तम शिंदे, शिवाजी जाधव, आदी उपस्थित होते.