बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिका प्रभाग समिती निर्मिती आणि जनजागृतीसाठी रविवार दि. १८ जून रोजी शहरातील वॉर्ड क्र. ५४ मध्ये जनग्रह एनजीओ संस्था बेंगलोर आणि राणी चन्नम्मा (आरसी) नगर प्लॉट ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राणी चन्नम्मा (आरसी) नगर असोसिएशन अध्यक्ष प्रमोद बुद्धाजी गुंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या उत्साहात संपन्न झाला.
प्रभाग समितीची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आणून दिल्याबद्दल येथील रहिवाशांनी जनग्रह एनजीओ संस्थेच्या गौरी गजबार यांचे आभार मानले. या कार्यक्रमात वॉर्ड ५४ मधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून प्रभाग समिती स्थापन करण्याचे एकमताने मान्य केले.
कार्यक्रमा दरम्यान वॉर्ड ५४ साठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल प्रमोद गुंजीकर यांचे येथील वॉर्ड ५४ रहिवासी आणि जनग्रह एनजीओच्या गौरी गजबार यांनी कौतुक केले.
0 Comments