- निजलिंगप्पा साखर संस्थेसमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरातील गणेशपूर मार्गावर असलेल्या निजलिंगाप्पा साखर संस्थेला घेराव घालून आज जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन छेडले.
यावेळी थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावित, तसेच बिले थकीत ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत संस्थेच्या प्रवेशद्वारा समोरच ठाण मांडून संतप्त शेतकऱ्यांनी निदर्शने केली.
रामदुर्ग तालुक्यातील शिवसागर आणि कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी शुगर्स या साखर कारखान्यांसह निजलिंगप्पा साखर संस्थेला ऊस दिलेल्या जिल्ह्यातील सहाशेहून अधिक शेतकऱ्यांची जवळपास आठ कोटी रुपयांहून ऊस बिले थकीत ठेवली आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी निजलिंगाप्पा साखर संस्थेच्या आयुक्तांकडे थकीत बिल देण्याची मागणी केली होती. तसेच आज दुपारी १२ वा. सुनावणीसाठी बोलावले होते, शेतकरी नियोजित वेळेत साखर महामंडळाच्या कार्यालयात येऊनही साखर आयुक्त कार्यालयात आले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
0 Comments