- निपाणीमधील १५ जण जखमी
- चालकाला डुलकी लागल्याने अपघात
निपाणी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ येथे शनिवारी (१०)पहाटे साडेचारच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेली क्रूझर (के.ए.२४ एम.२५८७) गाडी दुभाजकाला धडकून पलटी झाली. या अपघातामध्ये निपाणी येथील १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात टोलनाकाचेही नुकसान झाले असून वाहनाचा चक्काचूर झाला आहे. केवळ नशीब बरोबर तर म्हणून वाहनातील भाविक बचावले आहेत. या अपघाताची नोंद करण्याचे काम पोलीसात रात्री उशिरा सुरू होते.
निपाणी येथील काही भाविक परिसरातील नातेवाईक व मित्रमंडळी पंढरपूरकडे देवदर्शनासाठी क्रूझर वाहनातून निघाले होते. मात्र बोरगाव टोल नाक्यावर हा अपघात त्यामध्ये कमल दादासो नलवडे (वय ४८),वैशाली संजय हातकर (वय ४०),संजय तुकाराम हातकर,अलका भाऊसो सोनवणे (वय ३८),अंजली भाऊसो सोनवणे (वय १७),सुधा राजेंद्र माकवे (वय ३५),शिवनंदनी आकाश नलवडे (वय ०६),संगीता जोती हजारे (वय ३५),विमल भागवत चव्हाण (वय ५५),जोती रणजित डावरे (वय २४),जोतिबा बाळू हजारे (वय ४४),भाऊसो मधुकर सोनवणे (वय ४५),प्रकाश दादासो नलवडे, स्वराज्य रणजीत पवार तर चालक संभाजी खवरे (वय २४) हे सर्वजण निघाले होते. बोरगाव येथे टोलनाक्यानजीक वाहन आले असता चालकाला डुलकी लागल्याने क्लुजर वाहन दुभाजकावर जाऊन पलटी झाली.या अपघात वाहना मधील सर्वजण जखमी झाले आहेत.
हा अपघात झाल्याचे पाहताच काही नागरिक वाहनाच्या दिशेने धावले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना वाहनाच्या बाहेर काढण्यास प्रारंभ केला. यावेळी वाहनातील काही जणांना मार लागला होता. या अपघातात सुमारे १५ जण जखमी झाले आहेत. हे सर्व निपाणीहुन पंढरपूरला निघाले होते. सर्व जखमांना मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणूनच...
देवदर्शनसाठी जाणाऱ्या वाहनाचा चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला. या अपघातात पंधरा भावीक जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून भाविक बचवले आहेत.
0 Comments