• यादगिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बालीचक्रनजीक दुर्घटना
  • रस्त्यानजीक उभ्या ट्रकला क्रुझरची धडक   

यादगिरी दि. ६ जून : 

कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर बालीचक्र गावानजीक उभे असलेल्या एका ट्रकला क्रुझरने धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पनीर (वय ४०), नयामत (वय ४०), मुद्दसीर (वय १२), रमिझा बेगम  (वय ५०), सुम्मी (वय १२) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जवळचे नातेवाईक आहेत. मुद्दसीर हा मुनीर यांचा मुलगा आहे. हे आंध्र प्रदेशातील बांदी आत्मकुरू गावातील रहिवासी आहेत. तर वेलुगोडू गावातील तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. क्रुझर गाडीतील सर्वजण आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातून कलबुर्गी येथील ख्वाजा

बंदेनवाजा दर्ग्याच्या उरुसासाठी जात होते. दरम्यान क्रूजर गाडी, बालीचक्र जवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली या अपघातात एक मुलगा आणि मुलगी सह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत  तेरा जण जखमी झाली असून त्यांना यादगिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांची प्रकृतीही गंभीर आहे.