- अश्वारूढ शिवमुर्तीचे विधिवत पूजन
![]() |
फोटो सौजन्य : श्री. विनय कदम (मण्णूर) |
मण्णूर / विनय कदम
मण्णूर (ता. बेळगाव) येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक तथा समस्त भारत हिंदराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज मंगळवार दि. ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी मण्णूर येथील हिंदवी स्वराज युवा संघटना बेळगावच्यावतीने बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष तथा मराठा नेते विनय कदम यांच्याहस्ते गावातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीस अभिषेक करण्यात आला.
यानंतर देवस्की पंच अध्यक्ष मुकुंद तरळे, हिंदवी स्वराज युवा संघटन अध्यक्ष तानाजी तरळे, जयवंत बाळेकुंद्री, डी.एम.चौगुले, विष्णू चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुजित मंडोळकर यांच्याहस्ते मूर्तीस पुष्पहार घालून विधिवत पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ, महिला वर्ग, शिवप्रेमी तसेच गावातील विविध संघटनांचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments