बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील कॅम्प परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना विशेषतः महिलांना पायपीट करावी लागत आहे. परिणामी येथील नागरिकांनी दैनंदिन गरजांसाठी 'प्यास' फाऊंडेशनला पाणीपुरवठा करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत प्यास फाऊंडेशनने बेळगावच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील कॅम्प परिसरातील रहिवाशांना घरगुती वापरासाठी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी प्यास फाऊंडेशनचे संचालक आणि कॅम्प परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments