- 224 पैकी 125 जागांवर काँग्रेसची आघाडी
- एक्झिटपोलच्या अंदाजानुसार निकालाचा कल काँग्रेसच्या बाजूने
बेळगाव / प्रतिनिधी
- मतदार संघनिहाय निकालाचे ताजे अपडेट्स -
बेळगाव (ग्रामीण) 13 वी फेरी :
१. लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस) 50,083
२.आर. एम. चौगुले (म. ए.समिती) 32,165
३. नागेश अण्णाप्पा मनोळकर (भाजप) 14,074
बेळगाव (दक्षिण) 16 वी फेरी :
१.अभय पाटील (भाजप) 52148
२. रमाकांत कोंडुसकर (म. ए. समिती) 46,053
३. प्रभावती मास्तमर्डी (काँग्रेस) 9807
बेळगाव (उत्तर) 8 वी फेरी :
१. डॉ. रवी पाटील (भाजप) 27627
२. आसिफ उर्फ राजू सेठ (काँग्रेस) 22562
३. अमर यळळूरकर (म. ए. समिती) 3436
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून एक्झिट पोल च्या अंदाजानुसार राज्यातील २२४ जागांपैकी 125 जागांवर काँग्रेस, 69 जागांवर भाजप, 23 जागांवर जेडीएस, 7 जागांवर अपक्षांनी आघाडी घेतली आहे.
निकालाच्या प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार बेळगाव जिल्ह्यात बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तर मतदारसंघातून भाजपचे रवी पाटील, यमकनमर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश जारकीहोळी, चिकोडी (सदलगा) येथून काँग्रेसचे गणेश हुक्केरी, रामदुर्ग येथून काँग्रेसचे अशोक पट्टण, अथणीतून काँग्रेसचे लक्ष्मण सवदी, निपाणीतून राष्ट्रवादीचे उत्तम पाटील, अरभावी येथून भाजपचे भालचंद्र जारकीहोळी, सौंदत्तीतून काँग्रेसचे विश्वास वैद्य, बैलहोंगल येथून काँग्रेसचे महांतेश कौजलगी, कुडची मतदारसंघातून काँग्रेसचे महेंद्र तमण्णावर, रायबाग येथून भाजपचे दुर्योधन ऐहोळे, कागवाड येथून काँग्रेसचे राजू कागे, हुक्केरी मतदारसंघातून भाजपचे निखिल कत्ती, गोकाकमधून भाजपचे रमेश जारकीहोळी, खानापूर मधून भाजपचे विठ्ठल हलगेकर, निपाणीतून भाजपच्या शशिकला जोल्ले, कित्तूरमधून काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, रामदुर्ग येथून भाजपचे चिक्करेवण्णा यांनी आघाडी घेतली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या २२४ जागांसाठी २६१६ उमेदवार रिंगणात असून एकूण ६६ टक्के मतदान झाले आहे. कर्नाटकमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे मात्र निवडणुकीनंतर सत्तांतर घडण्याची शक्यता आहे.
0 Comments