सुळगा (हिं.) / वार्ताहर

कर्नाटक राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ  महाराष्ट्र आणि केंद्रातील दिग्गज नेते बेळगाव सीमा भागात दाखल झाले आहेत.

याच दरम्यान आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी हे बेळगाव येथे आले असता, महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघातील उमेदवार आर. एम. चौगुले यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.