सुळगा (हिं.) / वार्ताहर 

भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना सांबरा गावातून जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज सकाळी ग्रामीण मतदार संघातील सांबरा येथे त्यांची प्रचारफेरी मोठ्या उत्साहात पार पडली. 


यावेळी नागेश मनोळकर यांनी ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गत पाच वर्षात मतदार संघाचा विकास खुंटला आहे. तेव्हा भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट घडविण्यासाठी येत्या १० तारखेला बॅलेट युनिटवरील पहिल्या क्रमांकाच्या कमळ चिन्हा समोरचे  बटण दाबून मला अर्थात भाजपच्या अधिकृत उमेदवाराला प्रचंड मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.



यावेळी भारतीय जनता पार्टीचे गावातील प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यानंतर मुतगा येथेही नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी व सभा मोठ्या उत्साहात पार पडली. प्रारंभी नागेश मनोळकर यांनी प्रचारफेरीतून ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या. 






यानंतर झालेल्या जाहीर सभेत  पंतप्रधान  नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी येत्या १० तारखेला बॅलेट युनिटवरील पहिल्या क्रमांकाच्या कमळ चिन्हा समोरचे बटण दाबून भाजपला मतदान करा असे आवाहन केले. 

यावेळी गावकरी आणि युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाठीभेटी घेतल्या नागेश मनोळकर यांना भरघोस पाठिंबा जाहीर केला. या प्रचारफेरीला भाजप बेळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार  संजय पाटील, भाजप बेळगाव ग्रामीण  मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.