सुळगा (हिं.) / वार्ताहर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी हिंडलगा ग्रा. पं. हद्दीतील शिवमनगर, श्रीराम कॉलनी, वैभव कॉलनी, लक्ष्मीनगर येथे ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांचा जोरदार प्रचार करण्यात आला. मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी येथील नागरिकांनी नागेश मनोळकर आणि भाजपला जाहीर पाठिंबा दिला.


एकंदरीत प्रचार फेरीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागेश मनोळकर यांचे पारडे जड असून  येत्या निवडणुकीत मतदारसंघात नागेश मनोळकर यांच्या विजयाने भाजपचे कमळ फुलणार असा विश्वास मतदार संघातील जनतेतून व्यक्त केला जात आहे.












- कंग्राळी (खु.) येथे भाजपच्या प्रचारफेरी अन् सभेला उस्फुर्त प्रतिसाद -


आज कंग्राळी (खु.) येथे भारतीय जनता पार्टी बेळगांव ग्रामीण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार नागेश आ.मनोळकर यांची प्रचार फेरी व सभा मोठ्या उत्साहात पार पडली.







यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते धनंजय जाधव कंग्राळी खु गावातील युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- गणेशपूर भागातून नागेश मनोळकर यांना पाठिंबा -







- हलगा गावचा भाजप आणि नागेश मनोळकर यांना जाहीर पाठिंबा -