बेंगळूर : कर्नाटक विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून आमदार यू. टी. खादर यांची बिनविरोध निवड झाली असून आर. व्ही. देशपांडे यांनी खादर यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपविला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नूतन अध्यक्ष यू. टी. खादर यांचे अभिनंदन केले. यू. टी. खादर हे ५ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. खादर हे अतिशय उत्साही आणि सक्रिय राजकारणी असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे. विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सरकारच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments