- सद्यस्थितीत काँग्रेस आघाडीवर
बेळगाव / प्रतिनिधी
सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा संपली असून बेळगाव शहराच्या आरपीडी महाविद्यालयातील केंद्रावर मतमोजणीला प्रारंभ झाला असून आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बेळगाव जिल्ह्यातून भाजपची - 67, काँग्रेसची - 74, जेडीएसची - 21 आणि अपक्षांची - 2 जागांवर आघाडी आहे. पोस्टल बॅलेट्सच्या मोजणीत बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर , बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील यमकनमर्डीतून काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आघाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आरपीडी महाविद्यालय परिसरात पोलिसांसह निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. उमेदवारांबरोबरच त्यांच्या पक्षाचे मान्यता प्राप्त प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्वांची कसून तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्यासह शहर पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील सकाळपासूनच मतमोजणी केंद्रावरील सर्व हालचालींवर नजर ठेवून आहेत.निकालाच्या पार्श्वभूमीवर आरपीडी महाविद्यालय परिसरात १४४ कलम जमावबंदी लागू करण्यात आली असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
0 Comments