सुळगा (हिं.) / वार्ताहर
केंद्रात नरेंद्र मोदी आणि कर्नाटकात बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या डबल इंजिन सरकारने मूलभूत सुविधांचा विकास करण्यासह अनेक लोक कल्याणकारी प्रकल्प राबविले आहेत. विकासाचे हे पर्व सुरू ठेवण्यासाठी भाजपला निवडून देणे गरजेचे आहे.
मतदारसंघात रोजगार निर्मितीची योजना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे मोठे शैक्षणिक विद्यापीठ आणि आरोग्य सुविधांच्या परिपुर्ततेसाठी येत्या १० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत बॅलेट युनिटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या माझ्या नावासमोरील कमळाच्या फोटो समोरील बटण दाबून मला अर्थात भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करून आपल्या हक्काचे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांनी केले.
ग्रामीण मतदारसंघातील आंबेवाडी व गोजगा भागात बुधवार दि. ३ मे रोजी झालेल्या प्रचार फेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
प्रचार फेरी दरम्यान गल्लोगल्ली महिलांनी औक्षण व फुलांची उधळण करून करून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी येथील नागरिकांनी येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याकरिता भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांनाच पाठिंबा दिला.
यावेळी बेळगाव ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह आंबेवाडी, गोजगा गावातील प्रमुख कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागेश मनोळकर यांना बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या पूर्व आणि पश्चिम भागात मोठा पाठिंबा दिसून येत आहे. प्रत्येक गावातील रोड शो आणि सभांमध्ये लोक सहभागी होत आहेत.
0 Comments