सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्नाटक राज्यातील एसएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत सुळगा (हिं.) येथील ब्रह्मलिंग हायस्कूलची विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्ते गणपत कलखांबकर यांची कन्या कु. सेजल गणपत कलखांबकर हिने ९१.६८ टक्के गुण प्राप्त करून हायस्कूलमध्ये प्रथम तर उचगाव केंद्रात द्वितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थाचालक, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक - शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी तिचे अभिनंदन केले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
0 Comments