• ग्रामस्थ भाजप आणि नागेश मनोळकर यांच्या पाठीशी 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारानिमित्त  शुक्रवारी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील निलजी आणि  शिंदोळी गावांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ  प्रचारफेरी काढून सभा घेण्यात आली. या प्रचारफेरी आणि सभेला नागरिकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी भाजप आणि नागेश मनोळकर यांना जाहीर पाठिंबा दिला.  



प्रारंभी निलजी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागेश मनोळकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. 


यानंतर झालेल्या सभेत ग्रामीण मतदार संघातून भाजपचा आमदार विधानसभेत पाठविण्यासाठी  येत्या १० तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून नागेश मनोळकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. 

याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह निलजी गावातील युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर शिंदोळी गावातही प्रचारफेरी काढून नागेश मनोळकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. 




यानंतर झालेल्या सभेत केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा शाश्वत विकास साधण्यासाठी नागेश मनोळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. 

याप्रसंगी बेळगाव ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह शिंदोळी गावातील युवक,महिला गावातील जेष्ट नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.