सुळगा (हिं.) / वार्ताहर   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या कार्याने भारावून काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शुक्रवारी झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रवेश झाला. यावेळी नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांना पाठिंबा दिला. 



याप्रसंगी नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातून आलेले कोल्हापूरचे खा. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्रातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 



यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजपचे ओबीसी राज्य सचिव किरण जाधव , युवराज जाधव, बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा  विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर, नानाप्पा पार्वती, शंकरगौड पाटील, विना विजापूरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.