- हुक्केरी तालुक्याच्या कोटबागीनजीक अपघात
हुक्केरी / वार्ताहर
भरधाव इंडिका कारची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हुक्केरी - घटप्रभा राज्य मार्गावर कोटबागीनजीक ही घटना घडली. शिवानंद भुसगोळ असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
अपघाताची माहिती मिळताच हुक्केरी पोलिस निरीक्षक रफिक तहसीलदार व सहकारी मंजुनाथ कब्बुरी यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच उत्तरीय तपासणीसाठी हुक्केरीच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments