- कित्तूर येथे ग्रामस्थांचा वीज बिल भरण्यास नकार
कित्तूर / वार्ताहर
काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्याने जनता वीज बिल भरण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या कित्तूर तालुक्यातील वीरपुर ग्रामस्थांनी वीज बिलाचे पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
सरकार अस्तित्वात आल्यानंतर २४ तासांच्या आत २०० युनिट वीज मोफत देणार असल्याची घोषणा काँग्रेसने जाहीरनाम्याद्वारे केली होती.
तेव्हा आता काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याने आम्ही बिल भरणार नाही, अशी उत्तरे जनतेकडून विज बील वसुलीसाठी गेलेल्या हेस्कॉम कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. अद्याप शासन आदेश आलेला नाही, तोपर्यंत बिल भरा, विज बिल न भरल्यास मीटर बंद करून असे हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र काँग्रेस सरकार सर्व गोष्टींची दखल घेईल अशा शब्दात लोकांनी कर्मचाऱ्यांना विरोध केला. ग्राहक आणि हेस्कॉम कर्मचारी यांच्यातील संभाषण स्थानिकांनी मोबाईलवर रेकॉर्ड केले आहे.
0 Comments