सुळगा (हिं.) / वार्ताहर
शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित सुळगे (हिं.) येथील ब्रह्मलिंग हायस्कूलचा दहावीचा निकाल ९५.३४ टक्के लागला. एकूण ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी विशेष श्रेणीत ०६, प्रथम श्रेणीत २८ तर द्वितीय श्रेणीत ०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हायस्कूलमध्ये कु. श्रेया गणपत कलखांबकर हिने ९१.६८ टक्के गुण घेऊन (प्रथम), कु. श्रेया परशराम पिसाळे हिने ८९.६० टक्के गुण घेऊन (द्वितीय), कु. संध्या लक्ष्मण पाटील हिने ८८.१६ गुण घेऊन (तृतीय), कु. ऋतुजा अनिल कदम हिने ८७.८४ टक्के गुण घेऊन (चौथा) तर कु. नम्रता लक्ष्मण डोणकरी हिने ८७.२० टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments