बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील लढतीत काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मतमोजणीच्या 18 व्या फेरीअखेर ग्रामीण मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांना 71,336 महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना 34,825 तर भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांना 26,987 मते मिळाली आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतलेली आघाडी पाहता ग्रामीण मतदारसंघातून लक्ष्मी हेब्बाळकर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
दुसरीकडे बेळगाव उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांना १२ व्या फेरी अखेर ३८,५७१, भाजपचे उमेदवार रवी पाटील यांना ३४,७६२ तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळळूरकर ५८५७ मते मिळाली आहेत. या उमेदवारांचे मताधिक्य पाहता दोन्ही मतदार संघात काँग्रेसची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
0 Comments