सुळगा (हिं.) / वार्ताहर

बीजगर्णी, कावळेवाडी, सोनोली भागात बेळगाव ग्रामीण भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांचा काल सोमवारी भव्य प्रचार करण्यात आला. त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत असून नागेश मनोळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी केला आहे.

सोमवारी सायंकाळी नागेश मनोळकर यांची भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली. प्रारंभी बीजगर्णी येथे रॅली काढून नागेश मनोळकर यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या.


भाजपच्या माध्यमातून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मला भरघोस मतदान करा असे आवाहनही यावेळी नागेश मनोळकर यांनी केले. या रॅलीमध्ये अनेक मान्यवरांनीही मनोळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

याबरोबर कावळेवाडी, सोनोली गावातही प्रचार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप पक्षाचे नेते मंडळी, तसेच कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.