विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्यात रथोत्सवा दरम्यान दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दूर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत विजापूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील बसरकोड येथे आयोजित रथोत्सवादरम्यान चाकात अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बसरकोड पवड बसवेश्वर जत्रोत्सवानिमित्त सायंकाळी रथोत्सव सुरू असताना रथाला बांधलेली दोरी पकडताना ग्रामस्थ नागप्पा यल्लाप्पा वनक्याळ (२४) घसरल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या लोकांनी व पोलिसांनी तात्काळ गंभीर जखमी झालेल्या नागप्पाची सुटका करून अधिक उपचारासाठी त्याला तालुका रुग्णालयात पाठवले. मात्र बागलकोट रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. .मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीएसआय आरिफ मुशापुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत्यूची माहिती घेतली.
तर दुसऱ्या घटनेत विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील गोलगेरी गावात रथोत्सवात साहेब पटेल खाजा पटेल काचपुर (५५) यांचा दोरी तुटल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. गावातील लोक त्यांना मुदुकप्पा म्हणत. या घटनेत एकाचा पाय तुटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे रथोत्सव रद्द करण्यात आला आहे. तरीही त्या व्यक्तीचे दृश्य मोबाईलमध्ये कैद झाले.
0 Comments