धारवाड / वार्ताहर 

हेस्कॉमचे अधिकारी नागराज कुबहळळी यांनी निवडणूक कर्तव्य दुर्लक्ष केल्याबद्दल जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांनी त्यांना कर्तव्यावरून निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.

नागराज हे नवलगुंद मतदारसंघाचे  फ्लाईंग स्कॉड होते. या अधिकाऱ्याने सी - व्हिजिल ॲप  वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. अशावेळी पत्राने उत्तर द्यायचे बंधनकारक असतानाही नागराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सॲपद्वारे उत्तर दिल्याने त्यांना कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले आहे.