- रामचंद्र मन्नोळकर यांची ग्वाही
- प्रचारा दरम्यान बसुर्ते गावातील ग्रामस्थांशी साधला संवाद
सुळगा (हिं.) / वार्ताहर
बसुर्ते येथील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांनी दिली आहे.
काल रविवार दि. २३ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या प्रचारार्थ बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बसुर्ते गावात रामचंद्र मन्नोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी कामगारांनी समस्या मांडल्या तसेच विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले.
या पदयात्रेला रामचंद्र मन्नोळकर यांच्यासमवेत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments