• महिलांची लक्षणीय उपस्थिती 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांना तुरमुरी गावातून पाठिंबा दर्शविण्यात आला. शनिवारी तूरमुरी गावात पदयात्रा आणि सभा पार पडली. 

प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीला अभिवादन करून प्रचार फेरीला सुरुवात झाली. 




यानंतर प्रत्येक गल्लीत प्रचार यात्रेचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नागेश मन्नोळकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असेच निवडणुकीतील मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन सांगितले.   

यावेळी गावातील माता-भगिनी देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पदयात्रेला मिळालेला ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून ही प्रचाराची पदयात्रा आहे की, विजयी यात्रा असा प्रश्न निर्माण झाला होता.  

- बाची येथेही प्रचारफेरी आणि कॉर्नर सभा-  


तुरमुरीसह लगतच्या बाची गावातही काल शनिवारी प्रचारासाठी पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांनी नागेश मन्नोळकर यांचे जल्लोषी स्वागत केले. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.


यावेळी छोटी कॉर्नर सभा घेत मन्नोळकर यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावात पाण्याची समस्या असल्याचे महिलांनी निदर्शनास आणून दिले.

तेव्हा पाणी समस्या सोडविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती मन्नोळकर यांना दिली. तसेच तिलारी धरणातून मार्कंडेय नदीत पाणी वळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी धनंजय जाधव (बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष), हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर, विद्यमान सदस्य एन. एस. पाटील, मल्लाप्पा शहापूरकर  उपस्थित होते.