- हिंडलगा वासियांचा निर्धार
- प्रचार फेरीवेळी महिलांकडून फुलांची उधळण
- नागेश मन्नोळकरांबद्दलचा जिव्हाळा अन् नात्याचे उदाहरण
सुळगा (हिं.) / वार्ताहर
राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही सामाजिक कार्याच्या जोरावर हिंडलगा ग्रामपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अडीअडचणीच्या वेळी गावातील कोणीही हाक दिली तर त्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देत मदतीला धावून जाणाऱ्या नागेश मन्नोळकरांचे येथील नागरिकांसोबत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच नागेश मन्नोळकर गावातील प्रत्येक कुटुंबाचा भाग बनले आहेत. याचीच प्रचिती आज आली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामीण मतदार संघातील हिंडलगा येथील प्रचारफेरी दरम्यान गावातील महिलांनी फुलांची उधळण करत नागेश मन्नोळकरांबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
प्रारंभी श्री शिवालय मंदिर येथे शंभू महादेवाच्या आरतीने या प्रचार फेरीला सुरुवात झाली. हिंडलगा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असणाऱ्या शिवनगर, मराठा कॉलनी, वैभव कॉलनी, श्रीराम कॉलनी, सिंडिकेट कॉलनी, लिंगराज कॉलनी, लक्ष्मी नगर, सरस्वती नगर भागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली.
या वैयक्तिक ठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. तर नागेश मन्नोळकर यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तसेच आगामी काळातील मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन सांगितले. नागरिकांनीही येथे निवडणुकीसाठी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी त्यांच्यासमवेत हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर, बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव , काशिनाथ नाईक यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments