- शेकडो वाहने गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न
हुबळी / वार्ताहर
शिरगुप्पी (ता. हुबळी) येथील नेहरूनगर हायस्कूल समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ४० ते ४५ वर्षीय पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा रस्त्याच्या मधोमध जागीच मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर रस्त्यावरून जाणारी इतर वाहनेही मृतदेहावरून गेल्याने संपूर्ण मृतदेह छिन्नविछिन्न झाला आहे. अद्यापही मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
0 Comments