विजयपूर / वार्ताहर
दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विजयपूर शहरातील आयओसी पेट्रोलपंपानजीक विजयपूर वाहतूक पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. विनोद (वय २५, रा. सोलापूर, महाराष्ट्र) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच विजयपूर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद विजयपूर वाहतूक पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments