बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यासह शहरात आज यंदाच्या हंगामातील पहिल्याच वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली . गेले काही दिवस बेळगावचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात तर अंगाची काहिली होत होती. यामुळे अवकाळी पाऊस व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा होती.
गुरुवारी सायंकाळीच आकाशात ढग दाटून आले होते. त्यामुळे पाऊस होईल अशी अशा होती. मात्र पावसाने हुलकावणी दिली.त्यानंतर आज पहाटे ४.३० च्या सुमारास बेळगावच्या पश्चिम भागात वळवाच्या हलक्या सरी कोसळल्या.त्यानंतर पुन्हा दुपारी ३.३० च्या सुमारास शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी सखल भागात गटारी तुंबल्या.
0 Comments