निपाणी / वार्ताहर

खेळताना पाण्याच्या टाकीत पडून  बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आडी (ता. निपाणी, जि.बेळगाव) येथे घडली. श्रेयश (वय २.५ वर्षे) असे मृत अल्पवयीन बालकाचे नाव आहे. या घटनेनंतर श्रेयशच्या कुटुंबियांवर शोककळा  पसरली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार मृत श्रेयसचे आई - वडील मेंढपाळ होते. आई व आजी मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी घरी असलेल्या श्रेयशचा खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.