- अपघातातील जखमी व्यक्तीला केली मदत
चिक्कोडी / वार्ताहर
निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानाही अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करून आ. प्रकाश हुक्केरी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार हिरेकोडी (ता. चिक्कोडी) येथील बसस्थानकानजीक झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. यावेळी त्याचमार्गावरून विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी निवडणूक प्रचारासाठी निघाले होते. मात्र अपघातग्रस्त व्यक्तीला पाहिल्यानंतर ते थांबले अन् लागलीच विचारपूस करत अधिक उपचारासाठी त्याला चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
निवडणूक प्रचारात व्यस्त असूनही आ. प्रकाश हुक्केरी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अपघातग्रस्त व्यक्तीला केलेल्या मदतीमुळे परिसरात एकच चर्चा सुरु आहे.
0 Comments