- जिल्हाधिकाऱ्यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकाऱ्यांशी बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आचारसंहिता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोपविण्यात आलेली कामे योग्य पद्धतीने पार पाडा अशा सूचना नियुक्त केलेल्या विविध नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील पुढे म्हणाले की, आदर्श आचारसंहिता, प्रशिक्षण, वाहतूक व्यवस्थापन, संगणकीकरण, सायबर सुरक्षा, स्वीप, ईव्हीएम व्यवस्थापन, तक्रार निवारण इत्यादी विविध निवडणुकीच्या कामासाठी नोडल अधिकाऱ्यांना नियुक्त केले जातील आणि आवश्यक प्रशिक्षण आणि उपकरणेही दिली जातील. याशिवाय प्रत्येक पथकाकडे आवश्यक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या पथकाचा योग्य वापर करून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक काम नीटनेटकेपणे पार पाडावे असे त्यांनी सांगितले.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसा प्रत्येकाच्या कामाचा ताण वाढत जातो. त्यामुळे प्रत्येक बाबीची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, यासाठी प्रत्येक संभाव्य समस्या लक्षात घेऊन तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले. संबंधित प्रसंगासाठी लागणारे लेख व छपाई साहित्य साठा करून ठेवावा. वाहतुकीची व भोजनाची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले.या बैठकीला अपर जिल्हाधिकारी के. टी. शांतला, परशुराम दुडगुंटी, लक्ष्मण बाबली, निसार अहमद, राजश्री जैनापूर, श्रीशैल कंकणवाडी, प्रीतम नसलापुरे, रवी बंगारेप्पनवर, गुरनाथ कडबूर यांच्यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुकीसंदर्भातील तयारी स्पष्ट केली.
0 Comments