• गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला विश्वास 
  • भाजपचे उमेदवार नागेश मनोळकरांच्या प्रचारार्थ हिरेबागेवडी जि. पं. गटात रॅली 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

गत निवडणुकीत मतदारांनी ज्यांना निवडून दिले, त्यांनी या भागाच्या विकासासाठी काहीचं केले नाही. त्यामुळे आता परिवर्तन घडवण्याची वेळ आली असून नागरिक नागेश मनोळकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना बहुमत देतील असा विश्वास बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा गोकाकचे विद्यमान आमदार रमेश  जारकीहोळी यांनी व्यक्त केला. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी सकाळी हिरेबागेवडी जि. पं. गटात रॅली काढण्यात आली.





याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रचार रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली करविनकोप्प, मुत्त्नाळ, अरळीकट्टी, कल्लारकोप्प गावांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. 

 हिरेबागेवाडी गावाचे प्रलंबित प्रश्न सोडविणारं ! : नागेश मनोळकर यांची ग्वाही 

दुपारच्या सत्रात हलगा जि. पं. गटातील हिरेबागेवाडीमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. बसवेश्वर मंदिरापासून आंबेडकर गल्ली, मार्केट रोड, लक्ष्मी गल्ली, केरी गल्ली, चौडीकोट, बागवान गल्ली, मोमीन गल्ली, महात्मा बसवेश्वर सर्कलपर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली.



यावेळी फुलांची उधळण तसेच औक्षण करत स्वागत करण्यात आले. हिरेबागेवाडी गावाचे प्रलंबित प्रश्न सोडवत डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून भविष्यकाळात विकासात्मक कामे  करण्याची  ग्वाही नागेश मनोळकर यांनी दिली. 


प्रचार रॅलीला बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष  धनंजय जाधव,  जि. पं.  सदस्य शंकरगौडा पाटील, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.