सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांचा प्रचार दणक्यात सुरु आहे. गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसमवेत सुळगे (ये.), राजहंसगड, देसूर येथे प्रचारासाठी गेलेल्या नागेश मनोळकर यांना संपूर्ण गावात उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील सुळगे (ये.), राजहंसगड, देसूर येथे गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला भाजपचे बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह गावातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सुळगे (ये.) येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले. यानंतर विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात देवदर्शन करून प्रचार फेरीला सुरुवात झाली.
गल्लोगल्ली महिलांनी नागेश मनोळकर यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी नागेश मनोळकर यांनी मतदारांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच गावाच्या विकासासाठी असणारा संकल्प नागरिकांपुढे मांडला. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि कर्नाटकातील भाजप सरकारच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना सांगितली. यावेळी गावकऱ्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
यानंतर राजहंसगड, देसूर येथेही प्रचार रॅली काढण्यात आली. येथेही नागरिकांनी भाजप आणि नागेश मनोळकर यांना जाहीर पाठिंबा दिला.
0 Comments