• बेळगाव भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांना पाठिंबा 



सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. कर्नाटकात १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांना भाजपकडून ग्रामीण मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यास मारीहाळ ग्रामस्थांकडून निवडणुकीसाठी ५ लाख रुपये जमवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मारीहाळ येथे रविवार २ एप्रिल रोजी भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत गावातील जेष्ठ मंडळी व युवा कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला.

यावेळी प्रशांत सोगली १०,०००/-, नारायण जानकी ५०,०००/- बसवराज कुरबेट ५०,०००/- व स्वतःची कार डिझेल व चालकासह   निवडणूक संपेपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी  विठ्ठल कलंनावर यांनी १,००,०००/-,  संभाजी जानकी १०,०००/-, सुधीर धर्मोजी १०,०००/-, तीप्पाजी मोरे २५,०००/-, प्रशांत कलंण्णावर ५०,०००/-, आप्पण्णा मोदगे २५,०००/-, सुनील सोगली, २५,०००/-, बसवराज कलंन्नावर, ५०,०००/- व इतर कार्यकर्त्यांनी आपल्या क्षमतेनुसार  ५ लाखाचा निधी निवडणूक खर्चासाठी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.



या बैठकीला मल्लाप्पा कलंण्णावर,महादेव धनाई,नामदेव जानकी, शिधाप्पा साळुंखे, फकीर तळवार,अजित मोरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने   उपस्थित होते.