- दुचाकीसह सुमारे १८.३६० लि. मद्य जप्त
- उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
अथणी / वार्ताहर
दुचाकीवरून बेकायदा मद्यवाहतुक करणाऱ्या एकाला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मंगळवारी सायंकाळी अथणी विभागांतर्गत येणाऱ्या अथणी शहरातील आझाद सर्कल येथे अतिरिक्त आयुक्त उत्पादन शुल्क (गुन्हे) बेळगाव, सहआयुक्त बेळगाव विभाग, बेळगाव उत्तर जिल्हा उत्पादन शुल्क उपायुक्त, उत्पादन शुल्क उपधीक्षक व अथणी उपविभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून १८.३६० लि. मद्य व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याची एकूण किंमत रु.५७,१६७ /- इतकी आहे. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
0 Comments